शिक्षकांची कर्तव्ये आणि भूमिका

 शिक्षकांची कर्तव्ये आणि भूमिका

_आपली शाळा नावा रूपाला आणावयाची असेल तर_       

..........................................................

नेहमी सकारात्मक विचार मांडा व सकारात्मक रहा.

---------------------------------------------

कोणतेही काम हातात घेणे पुर्वीच तक्रारी, अडचणी मांडू नका.प्रत्यक्ष काम सूरू करून मगच समस्या सांगा

-----------------------------------------------------

1 शाळेत वेळेवर हजर रहा.

2 शाळेतून घरी जाण्याची घाई करू नका.

3 पूर्ण वेळ अध्यापन करा.

4 विद्यार्थ्याची गुणवत्ता दररोज तपासा.

5 गणवेश आग्रही ठेवा.

6 अध्यापनात सातत्य ठेवा.

7 निमित्त सांगणे बंद करा.

8 उणिवांवर पाणी सोडा.

9 पालकांकडून सहकार्य मागत रहा.

    शाळेची गुणवत्ता समोर मांडा.

10 आपण फक्त नोकरी करत

 आहोत म्हणुन कार्य करू नका.निव्वळ पाट्या टाकण्यासारखे काम नको .

11 फक्त विद्यार्थ्याचा विचार करा.

12 जाऊदे म्हणणे सोडा.

13 व्यवस्था ढासळली आहे म्हणून

     आपण ढासळू नका.

14 टाईमपास थांबवा.शाळेत नुसता वेळ घालवायला मोबाईल वापरू नका. मोबाईलचा वापर शैक्षणिक साधन म्हणून करा.

15 आपल्या सर्वच गोष्टी चांगल्या नाहीत.

     आपण त्यात सुधारणा करा.

16 कोणी चुकून कामे करा असे सांगीतले म्हणून रागवू नका.

17 खेड्यात ड्युटीचा त्रास करून घेऊ नका.

18 विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष द्या . ते आहेत म्हणून आपल्याला एवढा पगार मिळतो याचे कायम भान ठेवा.

19 फक्त आपणच शाळा उज्ज्वल करू शकता हे विसरू नका.

20 आपण कामचोरपणा करू नका . आपल्या आजूबाजूचे कामचोर सुधारा.

21 दररोज एक गोष्ट गुणवत्ता पूर्ण शाळेची इतरांना टाका, चालना मिळेल.                           

22. *कुणी चांगले काम करत असेल त्याला प्रोत्साहन दया . नावे ठेऊ नका सहकार्य करा.*

23. मला माफ करा म्हणायला शिका.

24.काम करणार्यांना फूस लावू नका. स्वतःच्या बुद्धीचा वापर करा...तुम्हीही सुशिक्षित आहात हे कदापि विसरू नका...

25.वरिष्ठांचा आदर करा...(वयाने आणि नियुक्तीने असलेल्या)

26. *खरे ते स्वीकारा -मान्य करा....माझे तेच खरे असा अट्टाहास धरू नका..*

27.आपला अमूल्य वेळ दुसऱ्यावर टीका करण्यात घालवू नका

28.सहकार्यांविषयी जाणीवपूर्वक गैर समज पसरवू नका..

29.विद्यार्थ्यांमध्ये वेळ घालवा....त्याना समजून घ्या...

कारण समाजात आणि शाळेत आपण ज्या गोष्टी देतो त्याच गोष्टी आपल्याकडे परत येत असतात...

💥💥 *शाळेची हानी तर आपली मानहानी.* 💥💥

No comments:

Post a Comment